दारूच्या दुकानात घुसला बिबटय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या टोंकमध्ये बिबटय़ाने दारूच्या दुकानात घुसून दोघांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्याला पाहण्यासाठी काही लोक गेले असता बिबटय़ाने हल्ला केला. यानंतर बिबटय़ा बाजूच्या दारूच्या दुकानात घुसला. दुकानाबाहेर एकावर, तर दारूच्या दुकानात एकावर अशी दोघांवर बिबटय़ाने झडप घातली. बिबटय़ाला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.