
पत्रकारांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाही तर आपल्या लोकशाहीच्या स्तंभानांच गंभीर इजा पोहोचेल, असे ताशेरे मारत येथील तीसहजारी कोर्टाने दिल्ली पोलिसांना गुरुवारी जणू आरोपीच्याच पिंजऱयात उभे केले. भाजपचे अमित मालवीय यांनी केलेल्या बदनामीच्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी ‘द वायर’वर गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत संपादकांसह काही पत्रकारांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती. ती परत करण्याचा मुख्य महानगर दंडाधिकाऱयांचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायधीश पवन सिंह राजावत यांनी योग्य ठरवला आहे.






















































