
आपल्या देशामध्ये हृदयसंबंधित आजार हे मृत्यू व आजारांसाठी प्रमुख कारण आहेत. प्रतिबंध आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत अनेक चर्चा होत असल्या तरी काहीच व्यक्ती हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक बदल करतात. कार्डिआक समस्या कधीही होऊ शकतात, त्यांना ‘सायलंट किलर्स’ म्हणूनदेखील संबोधले जाते. या आजाराचे परिणाम आरोग्यदायी व्यक्तीसाठीदेखील प्राणघातक ठरू शकतात. तसेच शहरी जीवनशैली वा इतर अनेक कारणांमुळे जो तणाव निर्माण होत आहे अशा तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कोणत्याही स्वरूपात हृदयाच्या आरोग्याबाबत तडजोड केली जाणार नाही.
स्वत:च्या वैद्यकीय स्थितीकडे लक्ष ठेवा : बाह्य घटक व प्रभावांमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य का ठरवले जावे? हृदयाच्या आरोग्यावर विविध घटकांचा प्रभाव होत असला तरी आपली जीवनशैली महत्त्वाची भूमिका बजावते. हृदय आपल्या शरीरातील प्रमुख अवयव आहे आणि जीवनशैलीमध्ये बदल करत आपण हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्याची खात्री घेऊ शकतो. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब असे कोमार्बिडिटीज असलेल्या व्यक्तींसाठी हृदयाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.
जीवनशैली आरोग्यदायी ठेवा : आज, हार्ट अॅटॅक्स आणि कार्डिआक समस्या फक्त 50 वर्षांवरील व्यक्तींपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. अधिकाधिक तरुणांना हृदयविषयक आजार होत आहेत. यासंदर्भात जागरूकतेचा प्रसार होत असला तरी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मिळालेल्या माहितीचे पालन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, जे अनेक व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. संतुलित आहार व नियमित व्यायाम महत्त्वाचे असले तरी रेड मीट, सॅच्युरेटेड फॅटस् व मिठाचे सेवन यावर प्रतिबंध ठेवणेदेखील आवश्यक आहे. डॅश डाएटसारखे अनेक व्यावहारिक, डाएट प्लान्स आहेत, ज्यांचे नियमितपणे पालन केले पाहिजे. व्यायामासंदर्भात आठवडय़ातून किमान पाच दिवस जलदपणे चालणे किंवा जॉगिंग करणे यांसारखे 30 मिनिटांपर्यंत पुरेसे व्यायाम शरीर आरोग्यदायी असण्याची खात्री देतात.
तसेच अशा व्यक्तींनी दररोज ‘पुरेशी झोप’ घेतली पाहिजे, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. मोबाइल फोनचा वाढता वापर आणि पीनवर अधिक वेळ व्यतीत केला जात असल्यामुळे व्यक्तींच्या झोपेच्या दर्जावर प्रतिकूल परिणाम होत आहेत, जे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत घटक आहेत. रात्रीच्या वेळी तीन तासांची झोप पुरेशी आहे हा समज पूर्णत: चुकीचा आहे.
प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करा: ‘बेटर सेफ दॅन सॉरी’ ही म्हण आपल्या हृदयाच्या आरोग्याशीदेखील संबंधित आहे. प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे ‘हृदयाचे आरोग्य उत्तम असणारी’ जीवनशैली आणि नियमित तपासण्यांमुळे लक्षणे दिसून न येणाऱया समस्येवर प्रतिबंध ठेवता येऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यासह हृदयविषयक आजाराचा धोका कमी करण्यासाठी सािढय उपाय सुरू करता येऊ शकतात.
हृदय हे फक्त स्नायू नसून महत्त्वाचा अवयव आहे, ज्याची काळजी घेणे व आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वैद्यकीय माहिती व सल्ले उपलब्ध असलेल्या युगामध्ये आपल्या आरोग्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन राखण्यासोबत प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले पाहिजे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर संतुलित आहाराचे सेवन, व्यायाम, पुरेशी झोप व धूम्रपान टाळणे अशा आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करत हृदयसंबंधित आजारावर प्रतिबंध ठेवता येतो.
डॉ. हरेश मेहता
(लेखक माहीम येथील फोर्टिस सहयोगी एस.एल.रहेजा हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत)





























































