पांढरे केस काही दिवसांतच होतील काळे, गुळासोबत खा ‘हा’ पदार्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढू लागली आहे. 25 ते 30व्या वर्षीच तरुणांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. विशेषत: स्त्रियांना त्यांचे केस लांब, दाट आणि काळे असावेत असे वाटत असते, परंतु तणावयुक्त जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे. या समस्येपासून सुटका होण्यासाठी गुळासोबत काही पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे केस पांढरे होणे थांबून ते काळे होऊ लागतील.

– कमी वयात तुमचे केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर मेथी दाण्यासोबत गुळाचे सेवन करावे. याकरिता मेथीदाण्याचे चूर्ण तयार करावे. दररोज एक चमचा मेथी चुर्णासोबत गुळाच्या खड्याचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावे. यामुळे पांढरे झालेले केस लवकर काळे व्हायला मदत होईल.

– गूळ उष्ण असतो. यामुळे थंडीत गूळ खाणे गुणकारी आहे. याव्यतिरिक्त बऱ्याचशा आजारांमध्ये गूळ खाणे फायदेशीर ठरते. केसांशी निगडीत समस्यांवर गूळ खाणे हा रामबाण उपाय आहे. यामुळे केस चमकदार आणि मजबूत व्हायला मदत होते.

– गुळात आयर्न, कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. याव्यतिरिक्त त्यामध्ये मिनरल्स आणि जीवनसत्त्वेही असतात. गूळ शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज गुळाचे सेवन केल्याने स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते.

– कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे अनेक असू शकतात. यामध्ये अतिव्यस्त आणि तणावयुक्त जीवनशैली, अनुवंशिक, शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता, व्यसन ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या टाळायची असेल तर या कारणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.