
शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी याकरिता आहारात दह्याचा समावेश केला जातो. दही खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. दह्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीर आरोग्यदायी राहण्याकरिता मदत होते. नियमित दही खाल्ल्याने पचनाचे विकार होत नाही. शिवाय दह्यामुळे केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारायलाही मदत होते, मात्र तुम्हाला माहित आहे का, दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही काही पदार्थांबरोबर दही खाल्ल्यामुळे आरोग्यावर विपरित परिणामही होऊ शकतो. पाहूया कोणत्या पदार्थांबरोबर दही खाल्ल्यास तब्येत बिघडू शकते.
कांदा आणि दही
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या विकारांपासून रक्षण होण्यासाठी काही लोकं कांदा आणि दह्याचे सेवन करतात. तुम्हालाही हे दोन्ही पदार्थ एकत्रितरित्या खाण्याची सवय असेल तर ती तुम्हाला बदलावी लागेल, कारण दह्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि कांदा उष्ण असतो. त्यामुळे दही आणि कांद्याचे एकत्रितरित्या सेवन केले तर शरीराचे नुकसान होऊ शकते.
दही आणि मासे
मासे खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या दूर व्हायला मदत होते, असे म्हणतात. जर एखादी व्यक्ती दह्यासोबत माशांचे सेवन केले तर त्याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. दही आणि मासे एकत्र करल्याने पोट बिघडते, पचन संस्थेवर याचा परिणाम होते. यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात.
दही आणि आंबा
आंबा आणि दही एकत्र करून खाऊ नये, कारण दही आणि आंबा या दोन्ही पदार्थांमधील गुणधर्म वेगवेगळे आहेत. एकत्रितरित्या हे पदार्थ खाल्ल्याने अपचन, पचनाचे विकार होऊ शकतात. याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचेशी संबंधित विकारही होऊ शकतात.

























































