Live – पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, जाहीर करत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • कोरोना रोखण्यासाठी दुसरा उपाय सापडला नाही तर लॉकडाऊन लावावाच लागेल
  • जनतेला जिवाशी खेळू नका, राजकारण करू नका
  • सरकार लॉकडाऊन लावणार की नाही, याऐवजी मी कोरोनाशी लढणार या निर्धाराची गरज
  • मास्क न लावणे म्हणजे शूरता नाही, मास्क लावण्यात लाजायची गरज नाही
  • कोरोना रोखण्यासाठीच्या सूचनांचे पालन केल्यास लॉकडाऊन टाळता येणार आहे.
  • डॉक्टर, आरोग्यसेवक यांच्या मदतीसाठी कोरोना विरोधातील लढाईसाठी रस्त्यावर उतरा
  • लॉडाऊनविरोधात नव्हे तर लॉकडाऊन होणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरा
  • कोरोनाच्या काळात राजकारण नको
  • अर्थचक्र आणि जनतेचा जीव वाचवणे या कात्रीत आपण सापडलो आहोत.
  • लॉकडाऊन खूप घातक आहे, याची जाणीव आहे.
  • अनेक देशांनीही कठोर निर्बंध जारी केले आहे.
  • ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, रशिया मधील परिस्थितीही बिकट आहे.
  • अमेरिकेनेही सात कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे.
  • रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणताही ठोस उपाय नाही.
  • लस घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
  • लस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याच्या घटना घडल्या आहेत.
  • लस घेतल्यानंतरही मास्क घालणे गरजेचे आहे.
  • लसीकरणाची संख्या वाढवत आहोत. ते आता गरजेचे आहे. लसीकरणाची क्षमताही वाढत आहे.
  • इतर सुविधा वाढवता येतील. मात्र, डॉक्टर आणि आरोग्यसेवक कोठून आणणार, हा चिंतेचा विषय आहे
  • रुग्णवाढ अशीच राहिल्यास सध्या असलेल्या सुविधा अपुऱ्या पडतील
  • जनतेच्या जिवाची जबाबादारी आपल्यावर आहे.
  • सध्या रुग्णवाढ झपाट्याने होत आहे.
  • आपण फिल्ड हॉस्पिटल, कोविड सेंटर उभारले, रुग्णांसाठी हे उभारण्यात आले.
  • त्यासाठी आपल्याला कोणी व्हिलन ठरवले तरी त्याची आपल्याला चिंता नाही
  • आपल्याला महाराष्ट्र आणि जनता प्यारी आहे. त्यांच्यासाठी आपण हे सर्व करत आहोत.
  • आपण काहीही लपवले नाही, लपवणार नाही. एकही रुग्ण लपवला नाही.
  • आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या जास्त ठेवण्यात आली आहे.
  • कोरोना चाचण्यांची संख्या अडीच लाखांवर नेण्याचे प्रयत्न आहेत.
  • कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब उभारल्या, चाचण्यांची क्षमता 1 लाख 82 हजारपर्यत वाढवली
  • आताच्या परिस्थितीची जनतेला माहिती देण्यासाठी आपण आलो आहोत.
  • आपण इथे कोणालाही घाबरण्यासाठी आलेलो नाही.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला 8.30 वाजता उद्देशून संबोधन करणार आहेत.