तुम्हाला ‘सबूत’ हवाय की ‘सपूत’ हवाय – पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेरठ

  • जेव्हा तुमचं समर्थन मिळेल तेव्हाच एक नवीन भारत निर्माण होऊ शकेल. जो भ्रष्टाचारमुक्त असेल- पंतप्रधान
  • तुमच्या समर्थनातूनच मजबूत आणि निर्णायक सरकार बनेल.
  • 1857च्या संग्रामात भाकरी आणि कमळाचा उपयोग राष्ट्रीय भावना चेतवण्यासाठी केला गेला होता. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून कमळ दर्शवलं गेलं होतं. आताही देशाच्या मजबुतीसाठी कमळाच्या माध्यमातून एकजूट व्हायचं आहे.
  • आज देशाचा गरीब असा संकल्प करत आहे, काँग्रेस हटवा तर गरिबी आपोआप हटेल
  • जेव्हा लहान होतो, तेव्हा मी गरिबी हटावचे नारे ऐकत होतो. पण, गेल्या काही वर्षांत गरीब अजून गरीब होत गेला आणि काँग्रेसची प्रगती होत गेली.
  • 2014 नंतर मेरठमध्ये दळणवळणाच्या सुविधा झाल्या.
  • हा लाभ दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना मिळत राहील.
  • किसान सन्मान योजनेतून अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाजप दिलासा देत आहे.
  • सपा सरकारमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप त्रास झाला. त्यांना त्यांचं उत्पन्न मिळत नव्हतं. हे चित्र भाजप सरकारने बदललं
  • सगळ्यांनी मतदान करणं आवश्यक आहे. सगळ्यांनी अत्याचाराविरोधात त्यांना शिक्षा देण्यासाठी 11 एप्रिल रोजी घराबाहेर पडा आणि मतदान करा.
  • तिहेरी तलाकला विरोध करणारे अजब युक्तिवाद करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिहेरी तलाक झाल्याने बाई जिवंत राहते.
  • बोर्ड बदलून दुकानं बदलत नाहीत. सपा आणि बसपाने केलेला विश्वासघात लोकं विसरलेली नाहीत.
  • उत्तर प्रदेशाची लूट करण्याच्या हेतूनेच हे लोक काम करत राहिले. मग 2014 आणि 2017मध्ये उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी योग्य निर्णय घेतला
  • उत्तरप्रदेशातही असं राजकारण पाहायला मिळत आहे. या लोकांसाठी सत्तेहून अधिक मोठं काहीही नाही.
  • एकमेकांविरुद्ध मतभेद असलेले आता एकत्र येत आहेत.
  • कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वंशवाद चालवणारे चौकीदाराला वैतागले आहेत. सगळीकडे एकसाथ आले आहेत.
  • अशा लोकांची राजकारणं तेव्हाच चालतात जेव्हा समाजात फूट पडलेली असेल, अनेक सामाजिक प्रश्न भेडसावत असतील.
  • हे लोक देशाला नेहमी कमकुवत बनवून ठेवू इच्छितात. नेमका कुणाला फायदा व्हावा म्हणून तुम्ही असं वागलात.
  • आपल्या वैज्ञानिकांनी एसॅटच्या परीक्षणाची मागणी केली होती, तेव्हाही हा निर्णय त्या सरकारने टाळला होता.
  • दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यांत आपले जवान शहीद होत राहिले, तेव्हाही आधीच्या सरकारने टाळाटाळ केली.
  • विमान दुर्घटना झाल्या तरी टाळाटाळ झाली, जवान बुलेटप्रुफ जॅकेट मागत होते, तेव्हाही टाळाटाळ झाली
  • या लोकांनी अनेक प्रकारे देशात भ्रष्टाचार केला आहे. वायूसेना नवीन विमान मागत होतं, तेव्हा टाळाटाळ झाली.
  • आज देश जेव्हा आपलं सामर्थ्य वाढवत आहे, अंतराळात चौकीदारी करण्यात समर्थ होत आहे, तेव्हा या लोकांच्या पोटात दुखतं
  • अशा लोकांच्या बुद्धिवर हसायचं की रडायचं हे कळत नाही.
  • काही बुद्धिमान लोक असे आहेत, ज्यांना काल मी एसॅट विषयी बोलत असताना त्यांना वाटलं मी थिएटरच्या सेटविषयी बोलत होते.
  • जेव्हा कोणी नाटक बघायला जातं तेव्हा त्यांना सेट संबंधित बोलणं ऐकायला मिळतं. जिथे नाटक असतं तिथे सेटविषयी चर्चा होत असते.
  • बुधवारी आपल्या देशाने अवकाशात मिळवलेल्या यशाला या लोकांनी दुर्लक्षित केलं. मला आता त्यांच्या बुद्धीवरच शंका यायला लागली आहे.
  • चिंता त्यांना असते ज्यांच्याकडे खूप काही असतं. ज्याला वंशवाद करायचा आहे.
  • मी कोणताही दबाव माझ्या मनावर नाही, कारण माझ्याकडे माझं असं काहीही नाही. जे काही आहे ते देशाने दिलं आहे. ते जे आहे जितकं आहे ते खूप आहे.
  • कोणताही राजकीय, आंतरराष्ट्रीय दबाव या चौकीदाराला त्याच्या ध्येयापासून दूर करू शकणार नाही.
  • तुम्ही शांत राहा, कारण मी माझ्या देशासाठी माझं सर्व काही उधळून द्यायला तयार आहे.
  • जर असं झालं असतं तर सर्व दोष मला देण्यात आला असता
  • जर 26 फेब्रुवारीला झालेलं मिशन जर चुकलं असतं तर लोकांनी माझे पुतळे जाळले असते, मला काळे झेंडे दाखवण्यात आले असते. माझ्यावर सडकून टीका झाली असती, माझा राजीनामा मागितला गेला असता.
  • 26 फेब्रुवारी या तारखेचा विचार करूनही अनेक दहशतवाद्यांना कापरं भरलं आहे.
  • माझ्या देशाचे सपूत हेच माझ्या देशाचे सबूत आहेत. जे सबूत मागतात तेच सपूतला आव्हान देतात.
  • मी जनतेला विचारू इच्छितो की तुम्हाला सबूत हवाय की सपूत हवाय
  • तुम्हाला पाकिस्तानचे हिरो हवेत की हिंदुस्थानचे?
  • हे सारे भ्रष्ट लोक पाकिस्तानात कोण जास्त लोकप्रिय होईल याची स्पर्धा करत आहेत. तिथल्या मीडियात गाजत आहेत. तिथले लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत.
  • मोदींनी हे का केलं, ते कां केलं, दहशतवाद्यांना का मारलं, त्यांच्या घरात घुसून त्यांना का संपवलं, असं म्हणत ते लोक रडत आहेत.
  • काही दिवसांपूर्वी चौकीदाराला शिव्या घालणारे आता रडत आहेत
  • जर आता आधीच्या भ्रष्ट सरकारला एकजरी संधी मिळाली तर पुन्हा आपण 2014 आधीच्या स्थितीत जाऊ
  • हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचं कारण गेल्या पाच वर्षांपासून आपण देशाला ज्या प्रकारे मजबूत करत होतो, तेच आता पुढेही करायचं आहे.
  • जेव्हापासून योगी सरकार आलं आहे, तेव्हापासून जनता सुरक्षित राहू लागली आहे. लेकीबाळींवर अत्याचार करण्यापूर्वी हजारवेळा विचार करतील कारण या सरकारने शिक्षा कडक केल्या आहेत.
  • मेरठ आणि उत्तर प्रदेशच्या जनतेने आधीच्या सरकारमुळे खूप सहन केलं आहे.
  • यांच्या (काँग्रेस) सरकारमध्ये गुंड, बदमाश बेलगाम फिरत होते. देशाच्या लेकींना न्याय मिळत नव्हता.
  • विरोधक भ्रष्टाचार करण्यासाठी वाटेल ती पातळी गाठू शकतात
  • मला सांगण्यात आलं की इथे मेरठमध्ये विरोधकांचे उमेदवाराने दहशतवाद्यांना कोट्यवधींचं इनाम जाहीर केलं होतं.
  • हे भ्रष्ट सरकार दहशतवाद्यांना संरक्षण देत होतं. दहशवाद्याची जात पाहून त्याला वाचवायचं की शिक्षा द्याची हे ते सरकार ठरवत होतं.
  • जेव्हा 2014पूर्वी जे भ्रष्ट सरकार दिल्लीत होतं, तेव्हा देशात बॉम्बस्फोट होत होते
  • आपल्या चौकीदाराच्या सरकारने जे प्राप्त केलं आहे, ते 2014 पूर्वीच्या देशातील स्थितीशी तुलना केल्यावरच सिद्ध होईल.
  • 11 एप्रिल रोजी जेव्हा देश पहिल्यांदा मतदान करेल, त्यावेळी प्रथम मतदान करणारा तरुण विकासाचं हे चित्र पाहूनच कमळाच्या चिन्हासमोरचं बटण दाबणार आहे.
  • सबका साथ, सबका विकासच्या विचारांवरच नवीन हिंदुस्थानची निर्मिती होत आहे.
  • देशातील असा कोणताही प्रदेश नाही, कोणतीही अशी व्यक्ती नाही, जी या विकासापासून अस्पर्शित राहिला आहे.
  • देशातील इमानदार करदात्यांना 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त करण्याचं कामही करून दाखवलं.
  • सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचं कामही याच सरकारने केलं.
  • 15 कोटी तरुणांना कर्ज देऊन स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं.
  • देशातील अडीच कोटींहून अधिक घरांना वीज मिळाली.
  • देशातील दीड कोटींहून अधिक बेघर कुटुंबांना स्वतःची पक्की घरंही आम्ही उपलब्ध करून दिली.
  • देशभरात 10 कोटी गरीब कुटुंबासाठी शौचालय उपलब्ध करून देऊन माता बहिणींना सन्मान मिळवून देण्याचं सौभाग्यही आम्हाला मिळालं आहे.
  • देशातील सात कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला.
  • जे गेल्या 70 वर्षांत गरीबांची बँक खाती उघडून देऊ शकले नाहीत, आज तेच खात्यात पैसे टाकायची भाषा करत आहेत
  • जेव्हा जनधनची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा काही बुद्धिमान लोक म्हणत की, देशात इतक्या बँकाही नाहीत, ग्रामीण माणूस काय करणार
  • देशातील 34 कोटी गरीबांसाठी जनधन योजनेतंर्गत बँक खाती उघडून देण्यात आली.
  • देशातील 50 कोटी गरीब कुटुंबाना दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय इलाजाची सुविधा केली.
  • देशातील तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटींची थेट वार्षिक मदतही याच सरकारने केली.
  • चाळीस वर्षांपासून सैनिक वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते. तेही या सरकारने करून दाखवलं.
  • जमीन असो, आकाश वा अवकाश.. सर्जिकल स्ट्राईकची ताकद आपल्या या सरकारने दाखवली आहे.
  • या देशाने फक्त नारेबाजी करणारी सरकारं पाहिली आहेत, पण आता पहिल्यांदाच निर्णयक्षम सरकार पाहत आहे.
  • ज्या देशात श्रमाचा, कामाचा, देशाच्या लेकींचा, देशातील प्रत्येक वर्गाचा, देशाच्या अभिमानाचा सन्मान असेल.
  • ज्या देशात संसाधनांची, ज्ञानविज्ञानाची, संस्कृती आणि विचार, आचार यांची समृद्धी असेल.
  • ज्या देशात दहशतवाद, देशाच्या शत्रूंपासून, भ्रष्टाचार, रोगराई यापासूंन सुरक्षा मिळेल.
  • एक असा देश ज्यात सुरक्षा, समृद्धी आणि सन्मानाचे संस्कार असतील.
  • आमचं लक्ष्य नवीन हिंदुस्थानाच्या निर्मितीचं आहे, असा देश जो आपल्या गौरवशाली इतिहासासारखाच वैभवशाली असेल.
  • एकिकडे दमदार चौकीदार आणि दुसरीकडे दागदार भरले आहेत.
  • एकिकडे नवीन हिंदुस्थानचे संस्कार आहेत तर दुसरीकडे वंशवाद आणि भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे.
  • एकिकडे निर्णयक्षम सरकार आहे तर दुसरीकडे दशकानुदशकं निर्णय टाळणारा इतिहास आहे.
  • आज एकिकडे विकासचा ठोस मुद्दा आहे, तर दुसरीकडे नीती, नियत आणि विचार यांचा काहीही पत्ता नाही
  • त्याचवेळी विरोधकांना विचारेन की तुमच्या सरकारवेळी तुम्ही अपयशी का ठरलात, देशाचा विश्वासघात का केलात?
  • येत्या काही दिवसांमध्ये सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा हिशोब देशासमोर ठेवेन
  • मी चौकीदार आहे आणि चौकीदार कधीही अन्याय करत नाही.
  • स्वतःच्या कामांचा हिशोब देईन आणि दुसऱ्याच्या कामाचा हिशोबही मागेन
  • मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की मी जे काम केलं आहे, त्याचा हिशोबही देईन
  • मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या प्रेमाची मी व्याजासह परतफेड करेन
  • पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडून आशीर्वाद मागितले, तुम्ही मला प्रेम दिलंत- पंतप्रधान
  • आम्हा सर्वांचे आदरणीय चरणसिंह चौधरी यांनाही माझं नमन.
  • हीच गौरवशाली परंपरा राखणाऱ्या सुकमा हल्ल्यातील शहीद शोभित शर्मा आणि पुलवामामधील शहीद अजय कुमार यांना माझी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो.
  • अशीच आकांक्षा 1857 साली अनेक हिंदुस्थानींनी बाळगली होती आणि त्याची सुरुवात मेरठपासूनच झाली होती.
  • ही निवडणूक ही प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात असलेला सशक्त हिंदुस्थानाशी संलग्न असलेली आहे.
  • 2019च्या निवडणूक प्रचाराची सुरुवात मेरठपासूनच सुरू करण्यामागे एक कारण आहे.
  • हिंदुस्थान आणि त्याचे 130 कोटी नागरिक आता पुन्हा मोदी सरकार यावं, अशी प्रबळ इच्छा बाळगत आहेत.
  • सगळ्या जगाला 2019 चा जनादेश पाहायचा असेल तर या सभेला जमलेली गर्दी पाहावी, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
  • उत्तर प्रदेश पश्चिम विभागाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांना माझा प्रणाम
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे.