कोकण शिक्षक पदवीधर निवडणूक, पावसाच्या फटकेबाजीत ७८.०५ टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vote

सामना ऑनलाईन । ठाणे

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ या चार जागांसाठी निवडणूक होत असून आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबई-कोकण-ठाणे भागात पावसानं रविवारी रात्रीपासून जोर धरला असला तरी मतदानावर त्याचा परिणाम सकाळच्या सत्रात पाहायला मिळाला नाही. भर पावसातही निवडणूक सुरळीत सुरू असून मतदार आपला हक्क बजावत आहेत. कोकणात एकूण ७८.०५ टक्के मतदान झाले.

कोकण पदवीधर मतदार संघ –
पालघर – ६३.८९
ठाणे – ७९.७२
रायगड – ८२.१६
रत्नागिरी – ७९.८१
सिंधुदूर्ग – ८८.०७
एकूण – ७८.०५

कोकणात मागील निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला आहे. २०१२ मध्ये कोकणात ५२ टक्के मतदान झाले होते. तसेच मतदारांनी संख्या घटूनही टक्का वाढल्याने सर्वांचाच उत्साह वाढला आहे. मागील निवडणुकीमध्ये कोकणात १ लाख ९ हजार मतदार होते तर यंदा हाच आकडा १ लाख ४ हजारांवर आला आहे. परंतु तरीही मतदारांनी उत्साह दाखवत धो-धो पावसातही मतदानाला हजेरी लावली.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक २०१८ साठी आज वांद्रे येथे मतदान केले.

uddhav-thackeray-family

पोलिंग एजंटना शिक्षा, मतदानावेळी मोबाईल जप्त

> कोकण विभाग पदविधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उरण तालुक्यातून तब्बल ८५.९२ टक्के एवढे मतदान झाले. उरण तालुक्यात एकूण १ हजार ४५६ पदविधर मतदार होते पैकी १ हजार २५१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५३८ स्री तर ७१३ पुरूषांनी मतदान केले.

> कोकण पदवीधर निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७८.०५ टक्के मतदान झाले. १२९४७ मतदार होते. यामध्ये ८३०३ पुरुष आणि ४६४४ स्त्रीयांचा समावेश आहे.

> कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूकिसाठी सोमवारी मालवण तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. मालवणात एकूण ८८.५६ टक्के एवढे मतदान झाले. या निवडणुकीसाठी मालवण तालुक्यात ५५७ मतदारांपैकी ४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी ५ पर्यंत

कोकणात मागील निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाची फटकेबाजी सुरु असतानाही सरासरी ५५ टक्के मतदान झाले आहे.

दुपारी १ पर्यंत

कोकण पदवीधर निवडणुकीत रायगड जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ५१.६% मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर संपूर्ण कोकण मतदार संघाचा विचार करता दुपारी १ वाजेपर्यंत ४५.१९% इतके मतदान झाले होते.

सकाळी ११ पर्यंत

सकाळी ७ ते ११ पर्यंत ठाणे जिल्ह्यात 9 हजार ७७५ मतदारांनी मतदान केले. म्हणजेच सुमारे २२ टक्के मतदान झाले.

शहापूरमध्ये आज सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह पाहायला मिळाला. ११ पर्यंत ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती देण्यात आली.

सकाळी ९ पर्यंत

अंबरनाथमध्ये सकाळी ९ पर्यंत ४२२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर शहापूरमध्ये १६६, तुर्भे येथे २२४, तर भाईंदर येथे ३४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ठाणे येथे ३२६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

पालघरमध्ये पावसात देखील मतदारांचा उत्साह कमी झाला नाही

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज होत असलेल्या मतदानात शिवसेना उमेदवार संजय मोरे यांनी नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे, तर त्यांच्या पत्नी, नगरसेविका सुखदा संजय मोरे यांनी ठाणे महापालिका मुख्यालयातील मतदानकेंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

sanjay-more-thane

दरम्यान, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विक्रोळी येथे मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.

sanjay-raut-vote

फोटो गॅलरी: ठाण्यात मतदारांचा उत्साह