पोलिंग एजंटना शिक्षा, मतदानावेळी मोबाईल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महाराष्ट्र विधानपरीषद नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज निवडणूक होत आहे. याकरता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यावेळी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आदेश असतानाही मतदान केंद्रावर मोबाईल आणल्याने पोलिंग एजंटकडील मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

शिक्षक मतदार संघाचे मतदान केंद्र रेसिडेन्शिअल कॉलेज नगर येथील केंद्र क्रमांक ६३, ६४ आणि ६५ या मतदान केंद्रामधे पोलिंग एजंटकडील मोबाईल जप्त करून जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितिन उबाळे आणि उपअभियंता प्रकाश उजागरे यांनी निवडणूक कार्यालयात जमा केले.

फोटो : विक्रम बनकर, नगर
फोटो : विक्रम बनकर, नगर