लॉकडाऊनमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ, मदत करण्याचं आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी समुदायाचा देखीलसमावेश आहे.

नगर जिल्ह्यातील एकूण 150 पेक्षा जास्त तृतीयपंथी समुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे भीक मागून खाण्याशिवाय पर्याय नाही. तृतीयपंथी कितीही शिकले तरीही त्यांना सन्मानाचा रोजगार अथवा काम मिळत नाही. परंतु समाजातील एखाद्या घरी मंगलकार्य असेल तर सर्वात प्रथम याच तृतीयपंथी समाजातील लोकांना बोलावून त्यांचा आशिर्वाद घेतला जातो. जेव्हा तृतीयपंथी भिक्षा मागतात तेव्हाच त्यांना पैसे मिळतात आणि त्या मिळालेल्या पैशातून ते आपली उपजीविका भागवतात. परंतु आज त्यांना उपजीविका भागवण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

नगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायाने आपल्या सामाजिक भावना जागृत ठेवत प्रत्येक राष्ट्रीय व नैसर्गिक आपतीत एक दिवसाची किंवा दोन दिवसाची संपूर्ण कमाई आपतीग्रस्त, देशबांधवांसाठी दिली आहे. त्यात 1993 सालचे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, मराठवाडा व गुजरातचा भूकंप, ओडिशातील चक्रीवादळ, त्सुनामी, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, कारगिलचे युद्ध, उत्तराखंडमधील भूस्सखलन, महाराष्ट्रातील दुष्काळ, तामिळनाडूतील महापूर, गावे पाणीदार होण्यासाठी पानी फाउंडेशनला मदत अशा विविध नैसर्गिक आपत्तीत तृतीयपंथीयांनी सर्वप्रथम यथाशक्ती सहयोग दिला आहे. पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी किंवा विविध वृत्तपत्रांचे सहाय्यता नीधी यातही शोषित महिलांनी सहयोग दिल्याचे संघटक पिंकी गुरु यांनी सांगितले, परंतु तृतीयपंथी यांना आज मदत मागण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.

तृतीयपंथी यांनी केलेली पुण्याई लक्षात घेत स्नेहालयच्या स्नेहज्योत प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोरडा शिधा देण्याचे आवाहन “एक मदत, जगेल भारत” या अभिनव अभियानास सुरुवात केली आहे. एका तृतीयपंथी किमान दहा दिवस जगेल असे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आले आहे. आपल्या ताटातील एक घास तृतीयपंथीयांना मदतीसाठी देण्यात यावा, असे आवाहन समस्त जनतेला या अभियानाचे प्रमुख प्रवीण मुत्याल आणि दीपक बूरम यांनी केली आहे. समाजातील संवेदनशील नागरिकांनी या अभियानास भरघोस प्रतिसाद दिलेला आहे.

या अभियानांतर्गत नगरमधील 30 पेक्षा जास्त तृतीयपंथीयांना कोरडा शिधा घरपोच देण्यात आला. तसेच सामाजिक विलगीकरण याबाबत जाणीवजागृती करण्यात आले. हे अभियान आणखी पंधरा दिवस पुढे चालवायचे आहे, त्यासाठी जास्तीजास्त देणगीची आवश्यकता आहे. यासाठी आपण पुढे दिलेल्या बँकेच्या डिटेल्स वर देणगी देऊ शकता.

Name Snehalaya, Ahmednagar Snehalaya, Ahmednagar 
Bank Name: State Bank of India HDFC Bank 
Branch name: MIDC Area, Nagapur ,Ahmednagar Market Yard Branch
Account Number : 35952926993 01811000053339
Name of Account (Cheque to be made in the name of): Snehalaya Snehalaya
9 digit MICR number: 414002002 414240002
Current/ savings account: Current account Savings  account 
SWIFT Code/ Remittance Instructions SBININBB507  
 RTGS/IFSC Code: SBIN0006040 HDFC0000181