Lok sabha 2019 युतीच्या उमेदवाराला निवडून द्या – सतेज पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । आजरा

कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे ध्येय्य सर्वांच्या मनात आहे. तेच माझ्याही मनात आहे. म्हणूनच युतीच्या उमेदवाराला निवडून आणा, असे अवाहन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आजरा येथे केले.

आमदार पाटील म्हणाले, विधायक कामांना आजरेकरांनी नेहमीच सहकार्य केले आहे. युतीच्या उमेदवाराला निवडून देणे, हेही त्यापैकीच आहे, असे समजून यावेळी युतीला ताकद देणे गरजेचे आहे.