Lok Sabha Election 2024 : गडचिरोलीत ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड, दोन तासांपासून मतदान झालेच नाही

गडचिरोलीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान आहे. देशात 102 तर राज्यात 5 मतदारसंघात आज मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली असताना गडचिरोलीच्या कुरखेड्यात ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने गेल्या दोन तासांपासून या मतदान केंद्रावर मतदान झालेले नाही. त्यानंतर बदलून आणलेल्या दुसऱ्या ईव्हिएम मशिनमध्येही बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलेले नागरीक खोळंबले आहेत. प्रशासनाकडून ही प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.,