आता दुसऱ्यांदा देशाचे स्वातंत्र्य धोक्यात!

‘ज्या ज्यावेळी देश संकटात आला त्या त्यावेळी सांगलीने योगदान दिले आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील, क्रांतिसेनानी नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, किसन वीर आणि जी. डी. बापू लाड यांच्यासारख्या क्रांतिकारकांची ही भूमी आहे. आता दुसऱयांदा देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. या दुसऱया स्वातंत्र्यलढय़ात क्रांतीची मशाल पेटलेली आहे. याची सुरुवात सांगलीतील प्रसिद्ध मारुती चौकातून होत आहे. या चौकातून ‘हिंद केसरी’ पैलवान मारुती माने, बिजली मल्ल पैलवान संभाजी पवार यांनी कुस्तीतील व राजकीय डाव यशस्वी केले आहेत. याच प्रसिद्ध मारुती चौकात पैलवान चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नवीन राजकीय डाव टाकत आहेत. हा डाव आपण यशस्वी करा,’ असे आवाहन शिवसेना पक्षाचे नेते-खासदार संजय राऊत यांनी केले. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या रॅलीत खासदार संजय राऊत बोलत होते.

महाविकास आघाडी भाजपला चारीमुंडय़ा चीत करेल – जयंत पाटील

आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीने राज्यात लोकसभेच्या 48 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. हातात हात घालून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राज्यभर काम करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी यावेळी भाजपला चारीमुंडय़ा चीत करेल, यात शंका नाही. असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील यांची समजूत काढू

-‘विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातील आहेत. त्यांनी अर्ज भरला म्हणजे बंडखोरी असे होत नाही. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू. महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकसंध आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीची भव्य एकजूट

– चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील भक्कम एकजुटीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष-आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते रॅलीत सहभागी झाले होते. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे सांगलीत आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष-आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-आमदार विक्रम सावंत व उमेदवार चंद्रहार पाटील यांची एक संयुक्त बैठक झाला