Lok Sabha Election 2024 : 9 केंद्रीय मंत्र्यांसह 2 माजी मुख्यमंत्री अन् माजी राज्यपालांचे भविष्य मतपेटीत होणार बंद

लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांवर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.17 टक्के मतदानाची नोंद झाली.

पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 16.63 कोटी मतदानर 1.87 लाख मतदान केंद्रावर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 9 केंद्रीय मंत्र्यांसह दोन माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालांचे भविष्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वानंद सोनोवाल, किरण रिजिजू, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जून राम मेघवाल, निसीथ प्रामाणिक आणि राज्यमंत्री एल. मुरुगन यांचा समावेश आहे.

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी हे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच तेलंगणाच्या माजी राज्यपाल टी. सौंदरराजन देखील लोकसभा निवडणूक लढत आहेत.

Lok Sabha Election 2024 Live Update : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 19.17 टक्के मतदान