आर्चरशी दोन हात नको रे बाबा – मोईन अली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

आमचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खरोखरच अतिशय खतरनाक गोलंदाज आहे. त्याचा वेग भन्नाट असून टप्पाही यष्टय़ांवर अचूक असतो. त्याच्या उसळत्या चेंडूवर फटका मारणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच.

त्यामुळे नेटमध्येही सर्व करताना जोफ्राशी दोन हात करणे कठीण आहे हो, अशा शब्दांत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आपल्या नव्या सहकाऱयाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सलामीच्या विश्वचषक लढतीत जोफ्राच्या एका उसळत्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकन सलामीवीर हाशिम आमला जखमी झाला होता. त्याला त्यानंतर काही काळ मैदानाबाहेर जावे लागले होते.