नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा जोरदार झटका, बँक ऑफ इंडियाचे 100 कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. लंडन हायकोर्टाने नीरव मोदीला बँक ऑफ इंडियाचे 10.7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 100 कोटी रुपयांचे कर्ज परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

निकाल देताना लंडन कमर्शियल कोर्टाचे न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी स्पष्ट केले की, नीरव मोदीने बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती आणि आता तो ती रक्कम परत करण्यास कायदेशीररीत्या बांधील आहे.