डायनासोरचा शोध ब्रह्मदेवाने लावला, पंजाबच्या भूगर्भशास्त्रज्ञाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाने सर्वात आधी डायनासोरचा शोध लावला, असा दावा पंजाब विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्रज्ञाने केला आहे. डायनासोरची नोंद ब्रह्मदेवाने वेदांमध्ये केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रा. आशू खोसला यांनी ब्रह्मदेवाला माहीत नाही, अशी कोणतीही गोष्ट जगात अस्तित्वात नाही. डायनासोर्सच्या अस्तित्वाबद्दल त्यांना ज्ञात होतं. त्याविषयी त्यांनी वेदांमध्ये लिहिलं होते, असा दावा केलाय. खोसला हे पंजाब विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र्ा विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जैविक संयोजनाबाबत शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे.

गुजरातमधील खेडा जिह्यात हिंदुस्थानी डायनासेरचा शोध खोसला आणि त्यांच्या पथकाने लावला होता. त्याचं राजसॉरस नर्मदा एन्सिस असे नामकरण करण्यात आले होते. साधारणपणे तब्बल 30 हजार वर्षांपूर्वी वेद लिहिल्याचे मानले जाते. डायनॉसोरचे अस्तित्व साडेसहा कोटी वर्षांपासून आधीचे आहे. याबाबत शंका उपस्थित केली असता वेद कागदोपत्री लिहिले गेले असल्यामुळे त्याला वैज्ञानिक आधार नसल्याचे उत्तर खोसला यांनी दिले आहे.