श्री राम सगळ्यांचे देव, आपणही मंदिराची वीट रचणार- फारुक अब्दुल्ला

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबतची सुनावणी 10 जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला  यांनी राम मंदिराबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण न्यायालयात नेण्याऐवजी न्यायालयाबाहेर सामंजस्याने सोडवायला हवे होते” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच “भगवान श्री राम हे फक्त हिंदूंचेच नसून ते संपुर्ण जगाचे आहेत. त्यामुळे भगवान श्री रामाबद्दल कुणाला शत्रृत्व असण्याचे कारण नाही. तसेच हा वाद सामोपचाराने मिटवून राममंदिर उभारायला हवे. तसे झाल्यास आपण स्वत: मंदिराची वीट रचण्यासाठी येऊ” असेही म्हटले आहे.

फारुक अब्दूल्ला यांनी राममंदिर प्रकरणी भाजप सरकारवर तोफ डागली आहे. भाजपला राम मंदिराबाबत काहीच देणेघेणे नाही. फक्त सत्ता मिळवण्यासाठी भाजप राम मंदिराबाबत राजकारण करत असल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या