कोरोनाग्रस्तावर यशस्वीरीत्या दुहेरी फुप्फुस प्रत्यारोपण, देशातील पहिली घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाग्रस्त रुग्णावर यशस्वीरीत्या दुहेरी फुप्फुस प्रत्यारोपण पार पडल्याची देशातील पहिलीच घटना नुकतीच घडली आहे. हैद्राबाद येथे क्रिष्णा इन्स्टिटय़ुट ऑफ मेडिकल सायन्सेस (किम्स) येथील डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली असून शुक्रवारी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

32 वर्षीय रुग्ण रिझवान हा चंदीगढचा रहिवाशी असून त्याच्या फुफ्फुसांना सारकोडोसिस झाले होते. रूग्णाची अवस्था गंभीर होती. याकर कायमस्वरूपी उपचार म्हणजे डबल ट्रान्सप्लान्ट. त्यातच त्याला कोरोना असल्याचे निदान झाले. मात्र हृदय तसेच फुफ्फुसांच्या प्रत्यारोपण शल्यचिकित्सेमध्ये पारंगत असलेल्या डॉ. संदिप अतावार आणि त्यांच्या टीमने हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. याबाबत डॉ. संदिप म्हणाले, ‘रुग्णाची प्रकृती गंभीर होती. त्यातच कोरोनामुळे त्याच्या फुफ्फुसांची अवस्था आणखी गंभीर झाली. फुफ्फुसांचे प्रत्यारोपण हाच एक पर्याय आमच्या पुढे होता..’