
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने या तीनही राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेल्या काँग्रेसकडून आता शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. मध्य प्रदेशमध्ये एका शेतकऱ्याला अवघी 13 रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
MP:A farmer of Agar Malwa’s Nipania Baijnath alleges his name was included in list of farm loan waiver,stating only Rs 13 waived off from loan of Rs 20000.Says,”My loan of Rs 20000 must be waived off as govt is waiving off loans up to Rs 2 Lakh.Officials say can do nothing.(21.1) pic.twitter.com/dtn2QkrW2J
— ANI (@ANI) January 24, 2019
मध्य प्रदेशमधील अगर मालवा येथील निपानिया बैजीनाथ यांच्यावर वीस हजार रुपयांचे कर्ज आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र निपानिया यांचे अवघे वीस हजारांचे कर्ज देखील पूर्ण माफ न होता त्यांच्या नावावर फक्त 13 रुपये माफ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. याबाबत बैजीनाथ यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर काहीही करू शकत नसल्याचे त्यांना सांगितले आहे.
‘सरकारने जर 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. माझे तर फक्त वीस हजार रुपयांचे कर्ज आहे ते तर पूर्ण माफ व्हायला पाहिजे’, असे बैजीनाथ यांनी एएनआयला सांगितले.


























































