मध्य प्रदेशातील हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. कारखान्यात अधून मधून अनेक स्फोट होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग वाढत आहे. या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर कारखान्यात काम करणारे अनेक जण आत अडकल्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगणयात आले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आग लागण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरदाच्या बेरागढच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तरच लोकांना वाचवता येईल. तेथे फटाके ठेवण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात विलंब होत आहे. त्यामुळे आग सतत भडकत आहे. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, या कारखान्यात किती लोक आहेत याची माहिती नाही. कारखान्यातील आग कोणत्याही प्रकारे आटोक्यात आणणे हे पहिले प्राधान्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.