चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकाला फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये दशवंत या तरुणाने सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.

या घटनेनंतर १९ फेब्रुवारी २०१८ रोजी चेंगलापट महिला न्यायालयाने दशवंतला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. या महिला न्यायालयाच्या मागणीची मान्यता करत मद्रासच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात यशवंतने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. दशवंतने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस विमला आणि एस रामथीलिंगम यांनी फेटाळून लावत त्याला मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

व्यवसायाने तंत्रज्ञ असलेला दशवंत मुगलीवाक्कम येथे राहत होता. दशवंतने फेब्रुवारी,२०१७ रोजी शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय चिमुरडीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह एका बॅगेत भरून ती बॅग फेकून दिली होती. पीडिता बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली होती. तपासाअंती पोलीस दशवंतपर्यंत पोहोचले आणि त्याने गुन्हा कबूलही केला होता.

यशवंतवर आधीच दागिने चोरीचा आणि त्याच्या आईच्या हत्येचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली होती. मात्र, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.