
महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येने नागरिक व विविध पक्षांचे कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे मोर्चेकऱयांच्या वाहनांसाठी पार्पिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग कुठे करायची व तेथे वाहनांची पार्पिंग क्षमता किती असेल ते पुढीलप्रमाणे…
n सीएसएमटी रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 18 (50 बसेस) n बॅलार्ड इस्टेट (50 बसेस) n कर्नाक बंदर बीपीटी पे अॅण्ड पार्क (70 बसेस) n मस्जिद बंदर – कल्याण स्ट्रिट (50 बसेस) n पी डिमेलो रोड (50 बसेसपार्) n भाऊचा धक्का (70 बसेस) n बीपीटी पे अॅण्ड पार्क, कॉटन ग्रीन (200 बसेस) n फॅशन स्ट्रिट (40 बसेस) n टाटा पॉवर पंपना n कर्नाक बंदर (150 कार) n मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयासमोरील रस्ता (40 बसेस).
मोर्चानिमित्त दक्षिण मुंबईत शनिवारी सकाळी 10 ते मोर्चा संपेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत खालीलप्रमाणे बदल असणार आहेत.
वाहतुकीसाठी बंद मार्ग ः
n रिचर्डसन अॅण्ड क्रुडास मिल n जे.जे. उड्डाणपूल n डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग n छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस n टाइम्स ऑफ इंडिया इमारत.
इच्छित स्थळी पोहचण्याकरिता खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दक्षिण मुंबईकडे जाणाऱया वाहनांनी गॅस कंपनी – चिंचपोकळी पुलावरून आर्थर रोड – सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल – डॉ. दादासाहेब भंडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड) – ऑपेरा हाऊस – महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा किंवा सात रस्ता सर्कल मुंबई सेंट्रल – ताडदेव सर्कल – नाना चौक एन.एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.
भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता डॉ. बी.ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन – दोन टाकी जंक्शन – जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा किंवा नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल – ताडदेव सर्कल – नाना चौक एन.एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचासुद्धा वापर करता येईल.
भायखळा / जिजामाता वनस्पती उद्यान (राणीची बाग) येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी संत सावता मार्गाने मुस्तफा बाजार, रे रोड, स्लिप रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पुढे पी. डिमेलो रोडने पुढे सी.एस.एम.टी.कडून इच्छित स्थळी.
परेल व लालबाग येथून दक्षिण मंबईकडे जाण्याकरिता बावला पंम्पाऊंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टास पंपनी, उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग, अल्बर्ट जंक्शन -उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा.
मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता, आर.ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी. डिमेलो रोडचा वापर करावा.
नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग (Eastern Free wayed) पी. डिमेलो रोडचा वापर करावा किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग (Eastern Free wayed) पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.
दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबईकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन – जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल – मरीन ड्राइव्ह मार्ग याचा वापर करावा.
दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसेच नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिककरिता पी. डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्गे (Eastern Free wayed) इच्छित स्थळी जाऊ शकतात.
दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकरिता महर्षी कर्वे रोड/मरीन ड्राइव्ह ऑपेरा हाऊस लॅमिंग्टन रोड, मुंबई सेंट्रल सात रस्ता – चिंचपोकळी – डॉ. बी.ए. रोड याचा वापर करावा किंवा महर्षी कर्वे रोड/मरीन ड्राइव्ह – नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी – डॉ. बी.ए. रोड याचा वापर करावा.
सीएसएमटी स्टेशनकडून पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरिता महापालिका मार्ग – मेट्रो जंक्शन – एल.टी. मार्ग, चकाला डावे वळण जे.जे. जंक्शन, दोन टाकी, नागपाडा जंक्शन खडा पारसी जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.


























































