महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा मंगळवारी, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप 27 फेब्रुवारी रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज दिली. जागावाटपाबाबत आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीतील जागावाटप आणि अन्य महत्त्वाच्या बाबींसंदर्भात महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. 27 फेब्रुवारीला आघाडीची बैठक होत असून त्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, असे चेन्नीथला यांनी सांगितले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार, असे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व घटक पक्षांशी चर्चा झाली असल्याचेही ते म्हणाले.