महासंचालकापासून अधीक्षकांपर्यंत आयपीएस बदल्या!

राज्य शासनाने गुरुवारी उशिरा आयपीएस अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यात अपर पोलीस महासंचालकांपासून पोलीस अधीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱयांचा समावेश आहे. दरम्यान, काही आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या असल्या तरी त्यांच्या नियुक्तीचे स्कतंत्र आदेश वाढण्यात येणार आहेत.

पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे राज्याच्या विशेष अभियानची जबाबदारी देण्यात आली. तर बदलीच्या प्रतीक्षेत असलेले विनय कारगावकर हे आता नागरी हक्क संरक्षण विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहतील. अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांची गृहरक्षक दलाच्या उपमहासमादेशकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच बदलीच्या प्रतीक्षेत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्याकडे राज्याच्या प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली असून मकरंद कानडे यांची बदली राज्य अन्केषण विभागात करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नव्याने करण्यात आलेल्या बदल्या- संजय बाविस्कर हे आता राज्य राखीव पोलिस बलाचे उपमहानिरीक्षक असतील तर राज्य राखीव पोलिस बलाचे नविनचंद्र रेड्डी यांची नागपूर शहरातल्या उत्तर विभागाची अपर पोलिस आयुक्त म्हणून वर्णी लागली. सुधारसेवा मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक दिलीप झळके हे आता नागपूरच्या दक्षिण विभागाचे अपर पोलिस आयुक्त असतील. तसेच संजय फुलारी यांना नागपूर गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले. बदलीच्या प्रतिक्षेत असलेले एम. बी.तांबाडे हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक व उपमहानिरीक्षक तर मनोजकुमार शर्मा हे राज्य सुरक्षा महामंडळाचे उपमहानिरीक्षक असतील. शिवाय निशीत मिश्रा यांच्याकडे मुंबईच्या संरक्षण व सुरक्षा विभागाच्या अपर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली. दहशतवाद विरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक जयंत नाईकनकरे यांची व्हीआयपी सिक्युरीटीचे उपमहानिरीक्षक तर मुंबई वाहतुक शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांची राज्य गुन्हे अन्केषण विभागात उपमहानिरीक्षक पदी नियुक्त करण्यात आली.

राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या नव्याने नियुक्त्या

गडचिरीलेच्या अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक मोहनकुमार गर्ग हे रत्नागिरीचे अधीक्षक तर रत्नगिरीचे प्रवीण मुंढे जळगावचे अधीक्षक असतील. मुंबईच्या गुन्हे विभागाचे उपायुक्त राजेंद्र दाभाडे हे सिंधुदुर्गचे अधीक्षक असतील. तर राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक सचिन पाटील हे नाशिक ग्रामीणचे, सोलापुर ग्रामीणचे अधीक्षक मनोज पाटील हे आता नगरचे, कोल्हापूरचे अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे पुणे ग्रामीण, तर गडचिरोलीचे शैलेश बलकवडे यांच्याकडे कोल्हापूर जिह्याचे, सिंधुदुर्गचे अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे सांगली, सहायक पोलिस महानिरीक्षक विनायक देशमुख यांची जालनाचे अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तसेच राज्य गुप्तकार्ता विभागाचे उपायुक्त राजा रामास्कामी हे बीडचे नवे अधीक्षक असतील. शिवाय ठाण्याचे उपायुक्त प्रमोद शेवाळे हे अधीक्षक नांदेड, राज्य राखीव पोलीस बल गट-13 चे समादेशक निखिल पिंगळे हे अधीक्षक लातूर, जयंत मीना हे अधीक्षक परभणी, रावेश कलासागर हे अधीक्षक हिंगोली, मुंबईच्या शीघ्र कृती दलाचे उपायुक्त वसंत जाधव हे अधीक्षक भंडारा, अमरावती शहरातले उपायुक्त प्रशांत होळकर हे अधीक्षक वर्धा, भंडाराचे अधीक्षक अरविंद साळवी हे अधीक्षक चंद्रपुर, नागपूर रेल्वेचे अधीक्षक विश्वा पानसरे हे गोंदियाचे अधीक्षक असतील तसेचअरविंद चाकरिया यांची बुलढाणाचे अधीक्षक, बुलढाणाचे डी.के. पाटील यांची यवतमाळचे अधीक्षक आण मुंबई पोलीस दलातील परिमंडळ 10 चे उपायुक्त अंकित गोयल यांची गडचिरोलीच्या अधीक्षकपदी कर्णी लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या