सीमाभागात कन्नडिगांचा हैदोस सुरूच, गदगमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केल्याचा दावा करूनसुद्धा त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे आज दिसून आले. सीमाभागात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असतानाही आज गदग परिसरात करवेच्या गुंडांनी पोलिसांसमोरच हैदोस घातला. महाराष्ट्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत फलक जाळले. तसेच एका ट्रकवर चढून लाल-पिवळा झेंडा फडकवत घोषणाबाजी करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले आहे.

सलग तिसऱ्या दिवशी एसटी सेवा बंद

स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार कर्नाटकात जाणाऱया दररोजच्या 1156 पैकी 382 एसटीच्या फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरातून निपाणी-बेळगावमार्गे जाणाऱया सुमारे 572 पैकी 312 फेऱया बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातूनही महाराष्ट्रात येणारी बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

निपाणी पालिकेवरीलही भगवा उतरवा; कन्नडिगांची अरेरावी

सीमा भागातील मराठी भाषिक चळवळीचे पेंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेवरील मराठी भाषिकांच्या अस्मितेचा असलेला भगवा ध्वज हटवल्यानंतर आता कन्नडीगांनी निपाणी नगरपालिकेच्या इमारतीवर फडकणारा भगवा ध्वज उतरवा, अशी अरेरावीची मागणी केली आहे.