मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशोमती ठाकूर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी’, असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.


सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे पॉझिटिव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी व त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी ही नम्र विनंती. काळजी घ्या, असे ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले आहे.