महाराष्ट्राचा अर्जुन राष्ट्रीय स्पर्धेचा विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या अर्जुन कढे याने रेल्वेच्या पृथ्वी शेखर याचा पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत 6-3, 6-4 असा सहज पराभव करून राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर प्रथमच आपले नाव कोरले. 27 वर्षीय अर्जुन कढेने यापूर्वी 12,14,16 व 18 वर्षाखालील तसेच, पुरुष एकेरी व दुहेरीत राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱया महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. गुरुग्राम, बलियावर्स येथील टेनिस प्रोजेक्ट येथे ही स्पर्धा पार पडली.