राज्यात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात 8 हजार नवे रुग्ण; मुंबईत साडेपाच हजार

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकादा झपाटय़ाने वाढू लागला आहे. मुंबई, पुण्यासह अन्य प्रमुख शहारांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला असून आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही 8 हजारांच्याही पुढे गेली आहे.

दिवसभरात राज्यात 8 हजार 67 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. याशिवाय राज्यात आज 1 हजार 766 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 65,09,096 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.46 टक्के एवढे झाले आहे.

मुंबईत 5428 रुग्ण

मुंबईत कालच्या रुग्णांच्या तुलनेत आज 5428 रुग्णांची वाढ झाली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या मुंबईत 16 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आज 412 नवीन करोनाबाधित आढळले आले आहेत.

बदलापुरात ओमायक्रोनचा पहिला रुग्ण

डोंबिवलीपाठोपाठ आता बदलापुरातही ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तो नायगाव पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असून त्याने विधानसभा अधिवेशन काळात डय़ुटी बजावली होतीz राज्यात आज चार ओमायक्रोन रुग्णांची नोंद झाली आहे. वसईविरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.