महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, उद्या मतदान

महाराष्ट्रात दुसऱया टप्प्यातील आठ लोकसभा जागांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 6 वाजता थंडावल्या. या जागांसाठी शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱया टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. मतदान संपण्यापूर्वी 48 तासांमध्ये सार्वजनिक सभा, लाऊडस्पीकर आणि मिरवणुकांवर बंदी असेल. दुसऱया टप्प्यात सुमारे दीड कोटी मतदार 204 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.