राज्यावर अवकाळीचे संकट कायम; काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा

राज्यात आता उन्हाने चांगलाच ताप वाढवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंशांवर गेला आहे. तसेच काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अजूनही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला असतानाच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 40 अशांवर पोहचले आहे. त्यातच आता राज्यावर वादळी वारे आणि अवकाळी पावसाचेही सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाच्या यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. मध्य महाराष्ट्र, पुणे, मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा ताप कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.