Lok Sabha Election 2024 : सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

सांगली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेदवार चंद्रहार पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित होते.