महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज दिव्यांग यांच्या समवेत तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. कोण आला रे कोण आला दक्षिणेचा वाघ आला, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अशा जोरदार घोषणाबाजी करत निलेश लंके यांचे या ठिकाणी स्वागत केले. तर दुसरीकडे विखे यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे ते त्याचा वापर करतीलच असा दावा सुद्धा लंके यांनी यावेळी केला.

नगर लोकसभा मतदार संघाच्या वतीने आज महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख जयंत वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेनेचे युवा संघटनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, प्रताप काका ढाकणे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, यांच्यासह शेतकरी संघटनेचे व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

काल महायुतीचे उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले, दुसरीकडे निलेश लंके यांनी आपण कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करणार नाही असे काल जाहीर केले होते. अतिशय साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार सामान्य माणसाला कोणत्या प्रकारचा त्रास द्यायचा नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानुसार त्यांनी आज सकाळी येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळपासूनच लंके समर्थकांची गर्दी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेली होती.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार निलेश लंके यांनी आज हनुमान जयंती आहे. या मुहूर्तावर आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. गावागावांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले असते तसेच उन्हाची तीव्रता ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे, उष्मा वाढत चालल्यामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झालेले आहे. त्यात आपण जर शक्तिप्रदर्शन करायचे म्हणले तर त्याचा त्रास आपल्याच लोकांना होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही त्रास देणार नाही अशी भूमिका घेतली होती व त्यानुसार आम्ही आज अतिशय साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नगर जिल्ह्यामध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालले आहे तशी दक्षिणेमध्ये पण आहे ती सुद्धा गुंडगिरी मोडीत काढायचे आहे असे ते म्हणाले. जो विकासाचा रथ आहे तो थांबलेला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये या ठिकाणी विकास न झाल्यामुळे आगामी काळामध्ये विकासाची कामे मार्गी लावाची आहेत. त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आपल्याला करायची आहे असे त्यांनी सांगितले. विरोधक आरोप करतात त्याच्यामध्ये फार अगदी काही तथ्य आहे असे नाही जर आम्हाला गर्दीत करायचे असल्यास ते आम्ही तुम्हाला गर्दी काय आहे हे सुद्धा दाखवून दिले असते, असा सवाल लंके यांनी यावेळी उपस्थित केला. दिनांक 19 तारखेला नगर या ठिकाणी आमची सांगता रॅली झाली. या रॅलीला आम्ही कुणालाही आणले नाही. मात्र काल भाजप उमेदवाराने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेला यांनी पैसे देऊन माणसे आणली व आणलेल्या माणसांना पैसे सुद्धा दिले नाहीत, अशी सुद्धा प्रकार उघड झालेले आहेत. त्यामुळे यांना सुद्धा गर्दी कशा पद्धतीने आणली. हे आता जनतेला माहीत झालेल आहे. जर राहुल गांधी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आले असते तर नगरचे रस्ते बंद करावे लागले असते आपल्याच लोकांचे हाल झाले असते, म्हणून आम्ही त्याचा फार हट्ट केला नाही, असे ते म्हणाले. कालचे विखे यांचे कृती पाहता यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. धनशक्ती वृद्ध सामान्य व्यक्ती अशी ही लढत आहे जनता ही अतिशय सुज्ञ आहे.

ते बळाचा वापर करतील

आज विखेंच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यामुळे ते सत्तेचा वापर हे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये करतील हे मी अगोदरच सांगितलेले आहे. या अगोदर सुद्धा माझ्यावर त्यांनी गुंडगिरीचे आरोप केलेले आहेत त्या आरोप अतिशय आहेत, कोण गुंडगिरी करते हे सगळ्यांना माहित आहे, असा टोलाही निलेश लंके यांनी यावेळी लगावला आता हीच गुंडगिरी आपल्याला मोडीत करायची आहे असेही ते म्हणाले. यांच्याकडे कोणतेच विकासाचे मुद्दे राहिलेले नाही त्यामुळे ते आता वेगळे मुद्दे बाहेर काढत आहेत या अगोदर इंग्रजीचा मुद्दा त्यांनी बाहेर काढला त्यानंतर गुंडगिरीचा काढला आता हे उद्या आपल्या चारित्र्याचा सुद्धा मुद्दा बाहेर काढायला काही कमी करणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी विखे पितापुत्रांना लगावला.

जनतेमध्ये जाणार

नगरची जनता सुज्ञ आहे आगामी काळामध्ये निवडणुकीचा प्रचार करताना आम्ही जनतेमध्ये जाणार आमचे चिन्ह आमच्या पक्ष हा जनतेला सांगण्यात काय विकासाची कामे करणार हे जनतेला आम्ही सांगणार असल्याचेही लंके यांनी यावेळी सांगितले.