कोरोनाला रोखण्यासाठी माजलगाव शहरात औषध फवारणी

874

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शनिवारी माजलगाव शहरात नगर परिषदेच्या वतीने शहरात सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे. जगासाठी अत्यंत घातकी ठरलेल्या कोरोना विषाणूचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. माजलगाव शहर व तालुक्यात 16 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेतली जात आहे.

माजलगाव शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता सुरू असून विविध आजारांचे निर्मूलन व्हावे यासाठी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी आपल्या शेतातील दोन औषध फवारणीचे ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. त्यानंतर नगर परिषदेच्या वतीने सोडियम हायड्रोक्लोराइड औषध टाकून त्याची संपूर्ण शहरात फवारणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जाधवर, नितीन नाईकनवरे, सभापती शरद यादव, दीपक मुंडे, संतोष यादव, शरद नाईकनवरे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या