केंद्र सरकार आणि प्रशासनाचा कद्रूपणा; ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्धाटन पत्रिकेत शिवसेना खासदार राजन विचारेंचं नाव छापलेच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधानांच्या हस्ते शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंक सह दिघा रेल्वे स्टेशन आणि उरण खारकोपर लोकलचे लोकार्पण होत आहे. त्यासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे स्थानिक खासदार राजन विचारे यांचे नाव न टाकण्याचा कद्रूपणा केंद्र सरकार आणि प्रशासनाने केला आहे.

नवी मुंबईतून राजन विचारे हे सात लाख 12 हजार मताधिक्याने निवडून आले आहेत. ‘केंद्र सरकार आणि प्रशासनाने त्यांचे नाव पत्रिकेत न टाकून सात लाख 12 हजाराहून अधिक मतदारांचा अपमान केला आहे. ज्यांच्या या मतदारसंघाशी काडीचाही संबंध नाही अशा सुनील तटकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहे परंतु ज्यांचा हा मतदारसंघ आहे त्या राजन विचारांचे नाव पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. हा राजशिष्टाचाराचा सरळ सरळ भंग आहे. विरोधक आहेत म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधीचे नावच टाकायचे नाही हा कुठला पायंडा केंद्र सरकारने पाडला आहे? माझे नाव पत्रिकेतून काढाल पण जनतेच्या मनातून कसे काढाल?’, असा खडा सवाल राजन विचारे यांनी केला आहे.

बेलापूर ते खारकोपर स्टेशन उभारताना भूसंपादनात अनेक अडथळे आले. खारफुटी आणि अनेक प्रश्न उभे ठाकले होते परंतु राजन विचारे यांनी हा माझा मतदारसंघ नाही असा विचार न करता त्या भूसंपादनासाठी वारंवार पाठपुरावा करून त्या परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु विचारांचे पत्रिकेत नावच टाकले नाही.

‘जनतेचे करोडो रुपये खर्च करून आयोजित करण्यात आलेला हा सरकारचा सोहळा आहे की पक्षीय सोहळा आहे’, असा सवाल राजन विचारे यांनी केला आहे.