
ममता बॅनर्जी यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्या कोणीच नाही, त्या मोठ्या मार्जिनने जिंकतील असा विश्वास रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक केला. तसेच पक्षाला 45 टक्के मतं मिळावी असे आमचे लक्ष्य आहे असेही किशोर म्हणाले
NDTV या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, “ पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी अँटी इन्कम्बसी आहे. पण हा असंतोष स्थानिक नेत्यांविरोधा आहे. गेल्या एक वर्षात हा असंतोष निर्माण करण्यासाठी पक्षाने प्रयत्न केला. आता ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असंतोष नाही. ममता बॅनर्जी आजही बंगालच्या लोकप्रिय नेत्या आहेत. आम्हाला कमीत कमी 45 टक्के मतं मिळवण्याचे लक्ष्य आहे. गेल्या 8-10 वर्षात मी एवढ्या महिला लोकप्रिय नेत्या पाहिल्या नाहीत जेवढ्या ममता बॅनर्जी आहेत. तसेच ममता बॅनर्जी जिंकत आहेत त्या मोठ्या फरकाने, मोठ्या मार्जिनने जिंकतील असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.




























































