गरज भासल्यास, मी स्वतः आंदोलनात उतरेन; CJP बाबत ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जंतरमंतर येथे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाबाबत भूमिका जाहीर केली आहे. गरज भासल्यास आपण स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

गरज पडल्यास आपण स्वतः कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात सहभागी होणार आहोत. आम्ही त्यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे आणि यापुढेही देत ​​राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे सीजेपीच्या सुरू असलेल्या आंदोलनात विरोधी नेते भेट देत पाठिंबा दर्शवत आहेत. आता ममता बॅनर्जी देखील जंतर मंतरवर येण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा पक्ष सुरुवातीपासूनच विद्यार्थी आंदोलनासोबत आहे आणि यापुढेही त्याला पाठिंबा देत राहील. त्यामुळे त्या या ठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे.

बंगालच्या राजकारणातील विरोधी पक्षांच्या एकतेबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. त्या म्हणाल्या, बंगालमध्ये भाजपविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी इंडिया आघाडीसोबत एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्यात कोणताही अहंकार नाही, असे त्या म्हणाल्या.