सामना ऑनलाईन । मुंबई
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांची आज 88 वी जयंती (ममता दिन). या निमित्त शिवाजी पार्क प्रवेशद्वार येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांनी माँसाहेबांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, उपनेते खासदार अरविंद सावंत, मीना कांबळी, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, उपमहापौर हेमांगी वरळीकर आदींसह महिला आघाडी उपस्थित होती.


























































