अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण करणाऱया तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

घराबाहेर खेळणाऱया चार वर्षांच्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवत तिला गर्द झाडीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करणाऱया लिंगपिसाट तरुणाला मुलुंड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. ही घटना भांडूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतली असल्याने आरोपीला भांडूप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भांडूपच्या खिंडीपाडा पाईपलाईन येथे गर्द झाडी आहे. तेथून जात असताना सरवानसिंग (25), टिंकू भारिचा (24) यांना त्या झाडीत मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी झाडीत जाऊन पाहिले असता एक तरुण मुलीचे लैगिंक शोषण करीत असताना सापडला. त्यामुळे सरवानसिंग आणि टिंकूने त्या तरुणाला पकडून मुलुंड पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी पोलिसांनी लगेच विजय यादव (38) याला भादवि कलम 363, 354सह 8 व 12 पोक्सो कायद्यानुसार अटक केली. परंतु ही घटना भांडूपमध्ये घडलेली असल्याने विजयला अधिक कारवाईकरिता भांडूप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.