महिलेला ‘आयटम’ म्हटले, सुरक्षा रक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

फोनवरून महिलेला आयटम बोलल्याने झालेल्या वादातून सुरक्षा रक्षकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर गोपाळ शेट्टी असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी गणेश गुरखा नावाच्या तरुणाला पवई पोलिसांनी अटक केली.

चंद्रशेखर हे पवई येथे पत्नी दोन मुलांसोबत राहत होते. ते पवईच्या लोक विहार सोसायटीमध्ये तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. चार दिवसांपूर्वी चंद्रशेखर आणि धनसिंग पारकी हे कामावर होते. रात्री चंद्रशेखरने एका महिलेला फोन केला. चंद्रशेखर महिलेला मस्करीमध्ये आयटम बोलला. याचा राग महिलेला आला. तिने याची माहिती तिचा पुतण्या गणेशला दिली. त्यानंतर गणेश आणि महिला हे तेथे आले. गणेशने चंद्रशेखरला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्या मारहाणीत चंद्रशेखर हे गंभीर जखमी झाले. मारहाणीत जखमी झाल्याने धनसिंगने चंद्रशेखरला अंधेरीच्या होली स्पिरिट रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर धनसिंगने याची माहिती चंद्रशेखरच्या पत्नीला दिली. त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गणेशविरोधात गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी चंद्रशेखरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूप्रकरणी पवई पोलिसांनी गणेशला अटक करून न्यायालयात हजर केले होते.