धावत्या बसमध्येच चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कल्याण

प्रवाशांनी खचाखच भरलेली केडीएमटीची बस धावत असतांनाच चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. याही परिस्थितीत चालकाने प्रसांगवधान राखत बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांचे प्राण वाचवले. या सर्व स्थितीत चालक वसंत शिंगोटे (52) यांचा मात्र मृत्यू झाला. आज रात्री कल्याणमध्ये घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने कल्याणकर हळहळले. कोळसेवाडी येथील गीता हरकीसनदास रुग्णालयाजवळ बस येताच अचानक शिंगोटे यांच्या छातीत जोराची कळ आली. प्रवाशांनी अन्य वाहनचालकांना थांबवून शिंगोटे यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र चक्की नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे दवाखान्यात नेण्यासाठी अर्धा तास गेला. खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.