महिलांना फसवणुकीने ‘सेक्स स्लेव्ह’ बनवणाऱयाला 120 वर्षे तुरुंगवास

स्वतःला सेल्फ हेल्प गुरू म्हणवणाऱया अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने 120 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. महिलांना सेक्स स्लेव्ह बनवण्याच्या खटल्यासंदर्भात कीथ रेनियरला दोषी ठरवण्यात आले आहे.

कीथवर महिलांची फसवणूक करुन करुन त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणजेच शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते. अनेक नामवंत श्रीमंत व्यक्ती कीथचे अनुयायी होते. कीथने त्याच्या अनुयायांना एनएक्ससीव्हीएम (Nxivm) असे नाव दिले आहे. कीथ आपल्या अनुयायांकडून पाच दिवसांच्या सेशन्ससाठी पाच हजार डॉलर्सची रक्कम घ्यायचा. अनेक महिलांनी कीथने केवळ आपली आर्थिक फसवणूक केली नसून लैंगिक अत्याचारही केले असल्याचे आरोप केले आहेत. आजीवन तुरुंगवास ठोठावल्याने आता कीथ तुरुंगाबाहेर येऊच शकणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या