नवी हेअरस्टाईल, चक्क डोक्यावरच घोडा

कोणाला काय करावेसे वाटेल सांगता येणार नाही. एका तरुणाची अनोखी हेअरस्टाईल चर्चेत आली आहे. या तरुणाने एका प्राण्याचे चित्र काढत अनोखी हेअरस्टाईल केली आहे. सध्या त्याच्या हेअरस्टाईलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणाने केलेल्या हेअरस्टाईलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या तरुणाची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांचे हसू थांबत नाहीय. या व्हिडीओत या तरुणाने आपले केस अनोख्या पद्धतीने कापून डोक्यावर प्राण्याचे चित्र काढले.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तरुण सलूनमध्ये केस कापत आहे. नंतर लक्षपूर्वक पाहिल्यावर त्याने डोक्यावर विचीत्र हेअरस्टाईल करुन घेतली. त्यावर घोड्याचे चित्र आहे. घोड्याची शेपटी आणि डोक्यावरचे केस हे सर्व स्पष्टपणे दिसतेय. पहिल्या नजरेत ते चित्र काढल्यासारखे वाटते, पण ती हेअरस्टाईल केली आहे.

लोकांना हा व्हिडीओ भरपूर आवडला आहे. ही हेअरस्टाईल फार मजेदार आहे. याआधी तुम्ही अशी हेअरस्टाईल पाहिली नसेल. व्हिडीओला ट्विटरवर @duvidofazer नावाने यूजरने शेअर केले. व्हिडीओला आतापर्यंत 6 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.