कंपनीने फॉल्टी मोबाईल बदलून द्यायला नकार दिला म्हणून तरुणाने केले आत्मदहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

नवीन घेतलेल्या फोन मध्ये महिनाभरात बिघाड आल्यानंतर कंपनी फोन बदलून देत नसल्याने एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिल्लीतील प्रल्हादपूर येथे घडली आहे. बाथरूम 20 टक्के भाजला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते

भिमसिंग असे या तरुणाचे नाव असून त्याने महिनाभरापूर्वी दिल्लीतील एका मॉलमधून सोळा हजाराचा स्मार्टफोन विकत घेतला होता त्याने तो फोन त्याच्या भाचीला ऑनलाइन अभ्यासासाठी दिला होता मात्र महिनाभरातच त्या फोन मध्ये बिघाड आल्याने तो तरुण मोबाईल घेऊन कंपनीच्या गॅलरीत गेला मात्र कंपनीने फोन बदलून देण्यास नकार दिला. भीम सिंग तरुण कंपनी वाल्यांची वाद घातला मात्र तरी त्यांनी बदलून देण्यास नकार दिला त्यामुळे वैतागलेल्या भीमसिंह यांनी कंपनीला आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला.

दिलेल्या इशाऱ्यानुसार भिमसिंग पुन्हा गॅलरीत आले त्याने. त्यांनी पुन्हा एकदा फोन बदलून देण्यास सांगितले मात्र कंपनीने नकार दिल्यानंतर भीमसेन मॉलच्या पार्किंग मध्ये जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आसपास असलेल्या लोकांनी भिम सिंग यांना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केलं.