वासरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावला; दृश्ये पाहून मालक हादरला

शेतकरी इयान फारवेल यांच्याकडे असलेल्या जनावरांपैकी काही वासरांना कोणताही आजार नसताना तसेच कोणतेही कारण नसताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या गोठ्यात अशा घटनांची संख्या वाढत होती. त्यामुळे फारवेल चिंतेत होते. या घडणाऱ्या घटनांमागे काहीतरी कारण असणार अशी त्यांना वाटत होते. या घटनेचा छडा लावण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी गोठ्यात सीसीटीव्ही बसवले. त्यानंतर त्यांना जे दिसले, त्यामुळे ते हादरून गेले आहेत.

फारवेल यांच्या शेतात लियान ब्राऊन हा काम करत होता. सीसीटीव्हीमध्ये रात्री गोठ्यात शिरत लियान वासरांशी संभोग करत असल्याचे सीसीटीव्हीमुळे उघड झले आहे. तसेच यावेळी तो पट्ट्याने वासरांची मान आवळत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सकाळी वासरांचा मृत्यू होत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावेळी त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्याला फारवेल यांना 600 पौडांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

वासरांच्या अचानक मृत्यूमुळे फारवेल आणि त्यांची कुटुंबियांनी यात काहीतरी कारण आहे, हे सष्ट झाल्याने सीसीटीव्ही बसवले. तसेच काही गंभीर असल्यास प्रवेशद्वारावर एकत्र यावे आणि विद्युत धक्क्याचे यंत्र सुरू करावे, असे ठरले होते. एका रात्री वासराला त्रास होत असल्याने त्याने हंबरायला सुरूवात केली. त्यांच्या मुलाने सीसीटीव्हीत बघितले असता लियान वासराची मान पट्ट्याने आवळत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचे दिसून आले. त्याने तातडीने कुटुंबियांना यांची माहिती दिली आणि प्रवेशद्वारावर बोलावले. तसेच त्याने तबेल्यातील प्रकाशझोत आणि विद्युत धक्क्याची यंत्रणा सुरू केली. अचानक प्रकाशझोत आल्याने लियानने पळ काढायचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत धक्क्याची यंत्रणा कार्यरत असल्याने पळण्याच्या प्रयत्नात असताना कुटुंबियांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत वासरावर लैगिंक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच सीसीटीव्हीमध्ये लियानविरोधात सबळ पुरावेही आढळले. न्यायालयात हजर केल्यावर लियानने गुन्हा कबूल केला. ही घटना अंत्यत किळसवाणी आणि लाजीरवणी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्राण्यासोबत अनैसर्गिक संभओग करणे आणि संरक्षित प्राण्याला इजा पोहचल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. अशा कृत्यासाठी तुरुंगवासाऐवजी त्याला पुनर्वसानासाठी संध देणे आणि चूक सुधारण्यासाठी त्याला तीन वर्षे सुधारगृहात काम करण्याचे आदेश दिले. तसेच 10 वर्षे पशुधन पाळण्यास मनाई करण्यात आली.