अखेर मणिपूर ‘अशांत’ घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच महिन्यांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये दोन दिवसांपासून पुन्हा हिंसाचार उफाळून आला. जुलैमध्ये अपहरण झालेल्या दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे पह्टो व्हायरल झाले आणि आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने केली. या भडक्याचे वणव्यात रूपांतर होण्याच्या भीतीने सरकारने अखेर आज मणिपूर अशांत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी डोंगराळ प्रदेशात ‘अफस्पा’ लागू करण्यात आला आहे. यातून 19 विशिष्ट पोलीस ठाण्यांचा परिसर वगळण्यात आला आहे.