
दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया रविवारी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतर-मंतरवर पोहोचले. यावेळी त्यांनी देशाला आता एका मोठ्या शिक्षण क्रांतीची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. तसेच या शिक्षण क्रांतीची सर्वात पहिली गरज म्हणजे देशाला पेपर माफियापासून स्वातंत्र्य मिळवून देणे, असे सिसोदिया म्हणाले. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मनीष सिसोदिया म्हणाले की, सत्य हे आहे की देशात केवळ पेपर विकले जात नसून, आपल्या सर्वांच्या मुलांचे भविष्यच बाजारात विकले जात आहे. या देशात कष्ट करणारा विद्यार्थी पुढे जाणार की पैशांच्या आणि वशिल्याच्या जोरावर पेपर विकत घेणारा, हे ही लढाईच ठरवेल. सोमवारी संसदेवर काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला आवाहन केले. “ही लढाई कोणत्याही एका राजकीय पक्षाची नसून आपल्या मुलांच्या भविष्याची आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी आणि सर्वच पक्षांच्या समर्थकांनी आपल्या मुलांसाठी जंतर-मंतरवर नक्की यावे.”
सोनम वांगचुक यांनी शिक्षण क्रांतीसाठी स्वतःच्या शरीराची बाजी लावली आहे, मात्र पंतप्रधानांनी आपले गुंड पाठवून पांढऱ्या चादरीची जादू दाखवत वांगचुक यांना गायब केले, असा थेट आरोप सिसोदियांनी केला. “पंतप्रधानांनी हीच जादू शिक्षणमंत्र्यांच्या खुर्चीवर दाखवली असती तर धर्मेंद्र प्रधान गायब झाले असते,” असा टोलाही त्यांनी लगावला.





























































