फिल्मफेअरमध्ये नामांकन न मिळाल्याने मनोज वाजपेयी नाराज, ट्विट करत व्यक्त केला राग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सुरज पर मंगल भारी या आगामी चित्रपटात अभिनेते मनोज वाजपेयी वेगेवगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

सामना ऑनलाईन । मुंबई

मनोज वाजपेयी हे बॉलिवूडमधल्या सर्वोत्तम कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांचा गली गुलिया या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाची वाह वाह झाली. त्यामुळे या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्काराचे साधे नामांकन देखील न मिळाल्याने मनोज वाजपेयी नाराज झाले असून त्यांनी ट्विटरवरून त्यांचा राग व्यक्त केला आहे. त्यांनी फिल्मफेअरचे थेट नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला असून या पुरस्कारांमध्ये कलेची पिळवणूक होत असल्याचा आरोप केला आहे.

नुकतीच 64 व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या नामांकनांमध्ये मनोज वाजपेयी यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गली गुलियां या चित्रपटाला एकही नांमांकन मिळालेले नाही. त्यावरून मनोज वाजपेयी भडकले असून त्यांनी त्याविषयी ट्विट केले आहे. ‘माझ्या जे जे सिनेमे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिले गेले, त्यांची प्रशंसा झाली त्या चित्रपटांना एका मोठ्या पुरस्कारांच्या नामांकनांच्या यादीत देखील स्थान मिळत नाही. पुरस्कार जिंकण्याचा तर मग विषयच नको. कलेचा छळ सुरूच आहे’ असे ट्विट त्याने केले आहे.