जरांगे-पाटलांची तब्येत खालवल्याने वडिगोद्री फाट्यावर मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन

जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे 10 फेब्रुवारीपासून विना अन्न,पाण्याचा त्याग करुन समाज बांधवांसाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस असल्याने जरांगे-पाटलांची तब्येत प्रचंड खालवली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्याने थेट जालना- धुळे – सोलापूर महामार्गावर येवून चक्काजाम आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जालना- धुळे- सोलापूर हायवेवर मराठा समाजाने चक्का जाम आंदोलन करत रास्ता रोको केला. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून पाटलांची तब्येत खालावली. त्यामुळे राज्यभरातून हजारो मराठा बांधव अंतरवालीत येत आहे. त्यांची तब्बेत बघून राहावत नसल्याने समाज बांधव प्रचंड संताप सरकारच्या विरोधात व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत अंतरवाली सराटीतून मराठा समाज आक्रमक होत थेट हायवेवरती आले आणि रास्ता रोको केला. या वेळी मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी होताना बघायला मिळाली. दरम्यान यावेळी
दोनही बाजून वाहांच्या मोठ्या रांगा लागल्याचं बघायला मिळाले.