शरीर संबंधास नकार दिल्याने मॉडेलची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑक्टोबर महिन्यात ओशिवारा येथे मानसी दीक्षित या मॉडेलची तिच्या मित्राने हत्या केली होती. त्या हत्या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे. मानसीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने तिचा मित्र सय्यद मुझाम्मिलने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. बांगूर नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

मानसी दीक्षित ही मुळची हैदराबादची असून तिला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे होते. हत्येच्या काही दिवस आधीच तिची फोटोग्राफर असलेल्या सय्यद मुझाम्मिलसोबत तिची ओळख झालेली. पाहातच क्षणी सय्यदला ती आवडू लागली होती. हत्येच्या दिवशी सय्यदने तिचे फोटोशूट करण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी बोलावले. तिथे फोटोशूटच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी त्याने मानसीकडे केली. मात्र मानसीने त्याची ही मागणी धुडकावून लावली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा रागाच्या भरात मुझाम्मिलने तिच्या डोक्यात स्टूल मारले आणि नंतर तिची गळा दाबून हत्या केली. मानसीचा मृतदेह बॅगेमध्ये भरून तो डबल रोड परिसरात फेकून दिला होता.

ओला ड्रायव्हरमुळे पकडला गेला मुझम्मिल
मानसीची हत्या केल्यानंतर मुझ्झमिलने ओला कॅब बुक केली. ओलाने तो मानसीचा मृतदेह असलेली बॅग घेऊन मालाडच्या डबल रोडवरील माइंड स्पेस ऑफिसजवळ आला. त्याने तेथे ती बॅग फेकली व तो पळून गेला. त्याच्या या सर्व हालचाली ओला चालकाने बघितल्या. चालकाला संशय आल्यामुळे त्याने 100 नंबरवर कॉल करून ही माहिती पोलिसांना दिली. त्या चालकाकडे मुज्जमिलचा मोबाईल नंबरदेखील होता. त्याआधारे बांगूरनगर पोलिसांनी मुज्जमिलला अटक केली.